नैसर्गिक वायू हे एक जैवइंधन आहे. नैसर्गिक वायू कच्च्या तेला पेक्षा २९% व कोळशापेक्षा ४४% कमी कार्बनडाय ऑक्साईडचं उत्सर्जन करतो. त्यामुळे नैसर्गिक वायू हे सर्वात चांगल पर्यावरणपूरक जैवइंधन आहे. नैसर्गिक वायू हा खोल समुद्राच्या तळातून विहीर खणून बाहेर काढण्यात येतो.
नैसर्गिक वायूची वाहतूक सोपी व आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावी म्हणून नैसर्गिक वायुच रुपांतर द्रव रुपात केलं जात. त्यासाठी हा वायू -१६० डिग्री सेल्सियस तापमानापर्यंत थंड केला जातो. या तापमानाला नैसर्गिक वायूचं रुपांतर द्रव रुपात होत व द्रवरूप वायुला ६०० पट कमी जागा लागते. या द्रवीकरण प्रक्रियेसाठी हा वायू समुद्राच्या तळामधून पाईपने द्रवीकरण प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यापर्यंत आणला जातो. या कारखान्याला खूप जमीन लागते व पर्यावरणाची हानीपण होते. याला पर्याय म्हणून शेल कंपनीने हि द्रवीकरण प्रक्रिया करणारी यंत्रणा एका अवाढव्य जहाजावर बसवण्याची योजना आखली आहे. शेल हि तेल व वायू उत्खनन उद्योगातील खूप मोठी कंपनी आहे. या जहाजाच बांधकाम साउथ कोरियातील जॉर्जे आयलंड इथल्या सॅमसंग हेवी इंडस्ट्रीजच्या गोदिमध्ये चालू आहे. या जहाजाच नाव प्रिल्युड आहे. या जहाजाची लांबी ४८८ मीटर व रुंदी ७४ मीटर आहे. या जहाजाला ऑस्ट्रेलिया पासून ४७५ किलोमीटर लांब समुद्रात नांगरण्यात येणार आहे. हे जहाज समुद्राच्या तळातील विहिरींमधून उत्खनन करण्यात आलेल्या वायुवर द्रवीकरण प्रक्रिया करून द्रवरूप वायू जहाजावरील टाक्यांमध्ये साठवणार आहे. कार्यान्वित झाल्यानंतर प्रिल्युड दरवर्षी ५३ लाख टन द्रवरूप वायुच उत्पादन करेल. या मध्ये ३६ लाख टन एलएनजी, १३ लाख टन कंडेनसेट आणि ४ लाख टन एलपीजी असेल.
द्रव रूप वायूची वाहतूक करण्यासाठी विशेष प्रकारच्या जहाजांचा वापर केला जातो. यांना एलएनजी कॅरीयर्स म्हणतात. एलएनजी कॅरीयर्स जहाजांवर क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. क्रायोजेनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जहाजावरील टाक्यांमध्ये अतिशीत तापमान टिकवून द्रवरूप वायू साठवण्यात येतो.
एलएनजी कॅरियर्
प्रिल्युडवर प्रक्रिया केलेला द्रवरूप वायू एलएनजी कॅरियर्स जहाजावरील टाक्यांमध्ये भरून जगभरात निर्यात करण्यात येणार आहे. प्रिल्युडबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघा.