स्पेसएक्स ऐक भन्नाट अमेरिकन कंपनी आहे. हि कंपनी अवकाशात उपग्रह व यान पाठवण्यासाठी रॉकेट्स बनवते. तसेच ती अवकाशयानं पण बनवते. नासातर्फे अवकाशात यान पाठवण्याचा परवाना मिळवणारी ती एकमेव खाजगी कंपनी आहे. हि कंपनी व्यावसायिक उपग्रह देखील अवकाशात स्थापन करून देते. ईलोन मस्क हा तरुण उद्योजक या कंपनीचा संस्थापक व मालक आहे.
|
फाल्कन ९ रॉकेट |
मध्यंतरी स्पेसएकस्ने फाल्कन ९ या रॉकेटच्या सहाय्याने ऑर्बकॉम या अमेरिकन कंपनीचे ११ उपग्रह एकाचवेळी अवकाशात प्रस्थापित केले. फाल्कन ९ या रॉकेटमध्ये ९ इंजीनंचा वापर करण्यात येतो. सगळ्यात महत्वाच म्हणजे या रॉकेटची खासियत हि आहे कि अवकाशात उपग्रह सोडल्यानंतर हे रॉकेट पुन्हा पृथ्वीवर यशस्वीरीत्या परत उतरू शकते. यामुळे पुन्हा पुन्हा रॉकेट्स बनवण्याचा खर्च वाचतो. सुस्थितीत परत आलेल्या रॉकेटमध्ये इंधन भरून पुन्हा नवीन उपग्रह अवकाशात पाठवू शकतो. यामुळे अवकाश प्रवासाचा खर्च कमी होऊन भविष्यात अवकाशात मानवी वसाहत स्थापन करण्यासाठी अशाप्रकारच्या रॉकेटचा खूप उपयोग होऊ शकतो. स्पेसएक्स ने
स्पेसएक्सतर्फे सध्या अवकाशयानामधून अवकाश संशोधनाशी संबंधित वैज्ञानिक उपकरणे तसेच अवकाशवीरांना आवश्यक साधन सामग्री पृथ्वीवरून अवकाश स्थानकात पोचवण्यात येते. तसेच या अवकाशयांना मधून अवकाश स्थानकात केलेल्या अवकाश संशोधन प्रयोगांचे नमुने परत पृथ्वीवर आणण्यात येतात.
|
फाल्कन ९ रॉकेटवर बसवण्यात आलेले अवकाशयान |
|
अवकाशयान |
|
अवकाश स्थानकावर नांगरण्यात आलेले अवकाशयान |
|
अवकाश स्थानकावरून पृथ्वीवर उतरताना अवकाशयान
|
|
समुद्रातून जहाजावर चढवण्यात आलेले अवकाशयान |
No comments:
Post a Comment