Saturday, April 16, 2016

स्पेस-एक्स





स्पेसएक्स ऐक भन्नाट अमेरिकन कंपनी आहे. हि कंपनी अवकाशात उपग्रह व यान पाठवण्यासाठी रॉकेट्स बनवते. तसेच ती अवकाशयानं पण बनवते. नासातर्फे अवकाशात यान पाठवण्याचा परवाना मिळवणारी ती एकमेव खाजगी कंपनी आहे. हि कंपनी व्यावसायिक उपग्रह देखील अवकाशात स्थापन करून देते. ईलोन मस्क हा तरुण उद्योजक या कंपनीचा संस्थापक व मालक आहे.



फाल्कन ९ रॉकेट 












मध्यंतरी स्पेसएकस्ने फाल्कन ९ या रॉकेटच्या सहाय्याने ऑर्बकॉम या अमेरिकन कंपनीचे ११ उपग्रह एकाचवेळी अवकाशात प्रस्थापित केले.  फाल्कन ९ या रॉकेटमध्ये  ९ इंजीनंचा वापर करण्यात येतो. सगळ्यात महत्वाच म्हणजे या रॉकेटची खासियत हि आहे कि अवकाशात उपग्रह सोडल्यानंतर हे रॉकेट पुन्हा पृथ्वीवर यशस्वीरीत्या परत उतरू शकते. यामुळे पुन्हा पुन्हा रॉकेट्स बनवण्याचा खर्च वाचतो. सुस्थितीत परत आलेल्या रॉकेटमध्ये इंधन भरून पुन्हा नवीन उपग्रह अवकाशात पाठवू शकतो. यामुळे अवकाश प्रवासाचा खर्च कमी होऊन भविष्यात अवकाशात मानवी वसाहत स्थापन करण्यासाठी अशाप्रकारच्या रॉकेटचा खूप उपयोग होऊ शकतो. स्पेसएक्स ने



स्पेसएक्सतर्फे सध्या अवकाशयानामधून अवकाश संशोधनाशी संबंधित वैज्ञानिक उपकरणे  तसेच अवकाशवीरांना आवश्यक साधन सामग्री पृथ्वीवरून अवकाश स्थानकात पोचवण्यात येते. तसेच या अवकाशयांना मधून अवकाश स्थानकात केलेल्या अवकाश संशोधन प्रयोगांचे नमुने परत पृथ्वीवर आणण्यात येतात.
                                                                              
फाल्कन ९ रॉकेटवर बसवण्यात आलेले अवकाशयान 

 
अवकाशयान 
                                                                                
अवकाश स्थानकावर नांगरण्यात आलेले अवकाशयान 


अवकाश स्थानकावरून पृथ्वीवर उतरताना अवकाशयान 

 
 

समुद्रातून जहाजावर चढवण्यात आलेले अवकाशयान 

 
 
 

Monday, February 16, 2015

आधार


माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या तत्कालीन सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला एक राष्ट्रीय ओळख क्रमांक देण्यासाठी २००९ साली नियोजन आयोगाच्या अखत्यारीत युनिक आयडेंटीफिकेशन आॅथोरीटी ऑफ इंडियाची स्थापना केली. या योजनेची संकल्पना इन्फोसिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन निलेकणी यांची होती. नंदन निलेकणीची  युनिक आयडेंटीफिकेशन आॅथोरीटी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करून त्यांना या योजनेची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश सरकारी कामकाजातील भ्रष्टाचार रोखून सरकारच्या विविध योजनांचा लाभ योग्य व गरजू लोकांना मिळवून देणे हा आहे. आधार ओळख क्रमांक देताना त्या नागरिकाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्याच्या हाताच्या बोटांचे व डोळ्यांच्या बुबुळाचे स्कॅनिंग करून ते संगणकावर साठवले जातात. यामुळे एका नागरिकाला एकच आधार क्रमांक मिळतो व सरकारला नागरिकाच्या हाताच्या बोटांच्या ठश्यांवरून व डोळ्यांच्या स्कॅनिंगवरून त्या नागरिकाची ओळख पटवता येऊ शकते. यामुळे प्रत्येक नागरिकाला सरकारी योजनेचा एकावेळी एकदाच लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत ७५ कोटी भारतीयांना आधार क्रमांक देण्यात आले आहेत. युनिक आयडेंटीफिकेशन आॅथोरीटी ऑफ इंडियाच्या http://uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून आपण आधार बद्दल सर्व माहिती जाणून घेऊ शकता.

तुम्ही आधार क्रमांकासाठी नोंदणी केली असल्यास https://resident.uidai.net.in/web/resident/check-aadhaar-status या संकेतस्थळावरून नोंदणीबद्दल माहिती मिळवू शकता. यासाठी तुमच्याकडे नोंदणी क्रमांक व नोंदणीवेळ असणे आवश्यक आहे.


तुम्हाला आधार क्रमांक मिळाला असल्यास त्याची इलेक्ट्रॉनिक प्रत आता तुम्ही http://eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच तुमचा मोबाईल नंबर अद्ययावत असणे आवश्यक आहे.


तुम्ही https://ssup.uidai.gov.in/web/guest/update या संकेतस्थळावरून मोबाईल नंबर तसेच नाव, पत्ता, लिंग व जन्म तारीख अद्ययावत करू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.


Thursday, December 18, 2014

शेल प्रिल्युड

नैसर्गिक वायू हे एक जैवइंधन आहे. नैसर्गिक वायू कच्च्या तेला पेक्षा २९% व कोळशापेक्षा ४४% कमी कार्बनडाय ऑक्साईडचं उत्सर्जन करतो. त्यामुळे नैसर्गिक वायू हे सर्वात चांगल पर्यावरणपूरक जैवइंधन आहे. नैसर्गिक वायू हा खोल समुद्राच्या तळातून विहीर खणून बाहेर काढण्यात येतो.
नैसर्गिक वायूची वाहतूक सोपी व आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावी म्हणून नैसर्गिक वायुच रुपांतर द्रव रुपात केलं जात. त्यासाठी हा वायू -१६० डिग्री सेल्सियस तापमानापर्यंत थंड  केला जातो. या तापमानाला नैसर्गिक वायूचं रुपांतर द्रव रुपात होत व द्रवरूप वायुला ६०० पट कमी जागा लागते. या द्रवीकरण प्रक्रियेसाठी हा वायू समुद्राच्या तळामधून पाईपने द्रवीकरण प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यापर्यंत आणला जातो. या कारखान्याला खूप जमीन लागते व पर्यावरणाची हानीपण होते. याला पर्याय म्हणून शेल कंपनीने हि द्रवीकरण प्रक्रिया करणारी यंत्रणा एका अवाढव्य जहाजावर बसवण्याची योजना आखली आहे. शेल हि तेल व वायू उत्खनन उद्योगातील खूप मोठी कंपनी आहे. या जहाजाच बांधकाम साउथ कोरियातील जॉर्जे आयलंड इथल्या सॅमसंग हेवी इंडस्ट्रीजच्या गोदिमध्ये चालू आहे. या जहाजाच नाव प्रिल्युड आहे. या जहाजाची लांबी ४८८ मीटर व रुंदी ७४ मीटर आहे. 
या जहाजाला ऑस्ट्रेलिया पासून ४७५ किलोमीटर लांब समुद्रात नांगरण्यात येणार आहे. हे जहाज समुद्राच्या तळातील विहिरींमधून उत्खनन करण्यात आलेल्या वायुवर द्रवीकरण प्रक्रिया करून द्रवरूप वायू जहाजावरील टाक्यांमध्ये साठवणार आहे. कार्यान्वित झाल्यानंतर प्रिल्युड दरवर्षी ५३ लाख टन द्रवरूप वायुच उत्पादन करेल. या मध्ये ३६ लाख टन एलएनजी, १३ लाख टन कंडेनसेट आणि ४ लाख टन एलपीजी असेल. 
द्रव रूप वायूची वाहतूक करण्यासाठी विशेष प्रकारच्या जहाजांचा वापर केला जातो. यांना एलएनजी कॅरीयर्स म्हणतात. एलएनजी कॅरीयर्स जहाजांवर क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. क्रायोजेनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जहाजावरील टाक्यांमध्ये अतिशीत तापमान टिकवून द्रवरूप वायू साठवण्यात येतो. 
एलएनजी कॅरियर्
प्रिल्युडवर प्रक्रिया केलेला द्रवरूप वायू एलएनजी कॅरियर्स जहाजावरील टाक्यांमध्ये भरून जगभरात निर्यात करण्यात येणार आहे. प्रिल्युडबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघा.





Tuesday, September 9, 2014

गुगल ग्रीन

गुगल ग्रीन हा गुगल कंपनीचा एक स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. जगभरात आज औद्योगिक प्रदूषणामुळे तापमानवाढ होतेय. संपूर्ण जगाला औद्योगिक विकासासाठी उर्जेची प्रचंड गरज आहे. गुगल कंपनीलासुद्धा त्यांचे संगणक २४ तास ३६५ दिवस चालू ठेवण्यासाठी प्रचंड उर्जा लागते. पारंपारिक उर्जा स्त्रोतांपासून निर्माण होणाऱ्या विजेमुळे मोठ्याप्रमाणावर प्रदूषण होते व कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. गुगल ग्रीन या उपक्रमा अंतर्गत कंपनीने आता अपारंपरिक उर्जा स्तोतांपासून निर्माण होणाऱ्या विजेचा जास्त वापर करण्यावर भर द्यायला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कंपनीने आपल्या कॅलिफोर्नियातील  मुख्यालयाच्या आवारातील सर्व इमारतींवर सोलार पॅनल बसवले आहेत. हे पॅनल १.९ मेगावॉट वीज निर्माण करतात. या सर्व इमारतींना लागणाऱ्या एकूण उर्जेच्या ३० टक्के उर्जा हे पॅनल निर्माण करतात.

गुगल हि एक संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. इंटरनेट आधारित सेवा पुरवणे हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय आहे. या सेवा पुरवण्यासाठी कंपनीला हजारो शक्तिशाली संगणकांची गरज लागते. हे संगणक कंपनी स्वतः बनवते. व संगणक बनवताना ते कमीतकमी ऊर्जेचा वापर करतील याची काळजी घेते. हे सर्व संगणक व या सर्व संगणकांना एकमेकांना जोडणारी उपकरणे हि एका मोठ्या इमारतीमध्ये ठेवली जातात. या इमारतींना डेटा सेंटर म्हणतात. कंपनीची जगभरात एकूण १२ डेटा सेन्टर्स आहेत. हि डेटा सेन्टर्स एकेका कारखान्या एवढी मोठी आहेत. या डेटा सेन्टर्सना २४ तास ३६५ दिवस चालू ठेवण्यासाठी प्रचंड उर्जा लागते. आणि म्हणून कमीतकमी ऊर्जेचा वापर करण्यासाठी या सर्व डेटा सेन्टर्सची आखणी आणि बांधकाम कंपनी स्वतः करते. त्यामुळे इतर कंपन्यांच्या तुलनेत गुगलची डेटा सेन्टर्स ५० टक्के कमी वीज वापरतात. कंपनीच्या अमेरिकेतील ७ पैकी ६ डेटा सेन्टर्सना आयएसओ ५०००१ मानांकन मिळाल आहे. हे मानांकन ऊर्जा व्यवस्थापन प्रणालीचा वापर करून ऊर्जेचा पूर्ण कार्यक्षमतेने उपयोग करणाऱ्या उद्योगांना देण्यात येत. या डेटा सेन्टर्सना लागणाऱ्या ऊर्जेपैकी जास्तीतजास्त ऊर्जा, अपारंपरिक म्हणजे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पामधून घेण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कंपनीने आता पर्यंत एकूण १०३९ मेगावॉट वीज खरेदी करण्यासाठी ७ पवन ऊर्जा प्रकल्पांबरोबर करार केले आहेत.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची वाहतूक व्यवस्था आहे.या वाहतूक व्यवस्थेमध्ये ५ टक्के बायोडिझेलवर चालणाऱ्या व सर्वात कमी प्रदूषण करणाऱ डिझेल इंजिन असलेल्या शटल बसेस आहेत. कंपनीचे ५००० कर्मचारी रोज घरून सानफ्रान्सिस्को परिसरातल्या कंपनीच्या कार्यालयांत जाण्यासाठी या बस चा वापर करतात. 

 तसेच गुगल कंपनीकडे शेव्रोले, निस्सान, मित्सुबिशी, फोर्ड व होंडा कंपनीच्या विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा ताफा आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना विजेवर चालणाऱ्या गाड्या विकत घेण्यासाठी प्रोत्साहन देते. त्यासाठी कंपनीने आपल्या कार्यालयाच्या आवारातील वाहनतळावर विजेवर चालणाऱ्या गाड्या चार्ज करण्यासाठी लागणारी चार्जींग स्टेशन्स बसवली आहेत.
भविष्यात कर्मचार्यांना मोफत चार्जींगची सुविधा देण्याची कंपनीची इच्छा आहे. तसेच कंपनी कर्मचाऱ्यांना पाई चालत किंवा सायकलवरून येण्यासाठी देखील प्रोत्साहन देते. पाई चालत येणाऱ्या किंवा सायकलवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी डिजिटल तिकीट देते. या डिजिटल तिकिटाच डॉलर मध्ये रुपांतर करून ते डॉलर त्या कर्मचाऱ्याच्या आवडीच्या सामाजिक संस्थेला किंवा सामाजिक उपक्रमाला दान दिले जातात.
गुगल कंपनीला फक्त स्वतःसाठीच नाही तर सर्वांसाठी आणि सर्वच क्षेत्रात अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर वाढवायचा आहे. म्हणून गुगल कंपनी त्यांना लागणारी वीज सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातून फक्त विकतच घेत नाही तर अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक सुद्धा करते. आतापर्यंत कंपनीने अशा १६ प्रकल्पांमध्ये एकूण ६००० कोटी रुपयांची गुंवणूक करण्याचे करार केले आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये एकूण २००० मेगावॉट वीज निर्माण होणार आहे. या सर्व उपक्रमांतून कंपनीने आता पर्यंत २१५०० मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड वायुच प्रदूषण होण्यापासून रोखल आहे.

आपण गुगलचा वापर करत असताना त्यामुळे प्रदूषण व पर्यावरणाची हानी होणार नाही याची गुगल कंपनी काळजी घेते याच समाधान वाटत.